मद्यधुंद कारचालकाची दुचाकीला धडक; महिला जखमी…

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोलगाव येथे मद्यधुंद अवस्थेत कारचालकाने दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना आज दुपारी घडली. दरम्यान त्याच मार्गावरून प्रवास करत असलेले सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ वकील बापू गव्हाणकर यांनी त्या महिलेला तातडीने मदत कार्य केले व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय दाखल केले.

मद्यधुंद असलेल्या चालकामुळे हा अपघात घडल्याचे स्पष्ट होताच, ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी अपघातग्रस्त कार जागेवरच जप्त केली आणि तातडीने पोलिसांना पाचारण केले. अपघातानंतर काही काळ कोलगाव रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. त्यांनी कार ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

error: Content is protected !!