वैभववाडीत जोरदार अवकाळी पावसाची संततधार… भात पिकाचे अतोनात नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात शनिवारी दिवसभर अवकाळी पावसाची संततधार सुरू होती. गेले काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे भात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. भात शेती भिजल्यामुळे गुरांच्या वैरणीचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. दिवसभर पडणाऱ्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला आहे. नोव्हेंबर महिना सुरु झाला तरी अवकाळी पाऊस थांबायचे नाव घेत नाही आहे. शनिवारी सकाळपासूनच दिवसभर तर जोरदार पावसाची संततधार सुरु होती. सतत पडणाऱ्या पावसामुळे भात कापणीत अडथळा येत आहे. तयार भात पीक आडवे पडल्यामुळे भात शेती कुजून त्यातून कोंब फुटू लागले आहेत. हातातोंडांशी आलेला घास असा जमीनदोस्त होताना शेतकरी हताशपणे पाहत आहेत.

error: Content is protected !!