वैभववाडी तालुक्यातील तिथवली गावात ठाकरे सेनेच्या गाव शाखेचे उद्धाटन

विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते फीत कापून झाले उद्धाटन

“गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक” बाळासाहेबांनी दिलेल्या विचारांचे पालन – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील तिथवली गावात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गाव शाखेचे उद्धाटन आज संपन्न झाले. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत तिथवली गाव शाखेचे उद्धाटन संपन्न झाले. विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते फीत कापुन, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित महिलांच्या वतीने मान्यवरांचे औषण करून स्वागत करण्यात आले.

यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत म्हणाले, गावातील सर्व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आज या तिथवली गावात शाखेचा शुभारंभ करण्यात आला आहे. आज पक्षाचा कठीण काळ जरी असला तरी या परिस्थितीत चांगले काम केल्यावर संघटना चांगल्या पद्धतीने उभी राहते. आता जरी पडता काळ असेल तरी आता होऊ घातलेल्या जि. परिषद, पं. समिती च्या निवडणुकीमध्ये उमेदवार सांगत आहेत. आम्ही या ठिकाणी लढाई करणार आहोत व निश्चितच यामध्ये आपला विजय होईल असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे. शिवसेना हा विचारांवरती चालणारा पक्ष आहे. त्यामुळे कोणी कार्यकर्ता जरी गेला असेल तरी मागून येणारा कार्यकर्ता हा विचार पुढे घेऊन जाणार आहे. ज्या उद्देशाने ही शाखा उघडली आहे त्या उद्देशाने लोकांना न्याय देण्याचे काम व जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम या गाव शाखेच्या माध्यमातून करा.

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले, तिथवली गावात शाखा व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. या गाव शाखेच्या माध्यमातून गावातील प्रश्न सोडवण्याचे काम गावातील कार्यकर्त्यांनी करा. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती ची निवडणूक ग्रामीण भागात आहे. एक आनंदाची गोष्ट आहे की पक्षाच्या कठीण काळात सुद्धा लढणारे शिवसैनिक आपल्याकडे आहेत. वैभववाडी तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती ला एका जागेवर दोन ते तीन उमेदवार इच्छुक आहेत. पक्ष संघटना म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पक्ष देईल त्या उमेदवारच्या पाठीशी उभे राहणे हे तुमचं कर्तव्य आहे. बाळासाहेबांनी दिलेला विचार “गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक” हा जोपासणे गरजेचे आहे. उस्फुर्त वातावरणात शिवसैनिकांच्या मोठ्या उपस्थितीत तिथवली गावात गाव शाखेचे उद्धाटन आज संपन्न झाले.
यावेळी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, माजी तालुका सभापती लक्ष्मणराव रावराणे, तालुका सचिव गुलझार काझी, कोकीसरे विभाग प्रमुख यशवंत गव्हाणकर, कोळपे विभाग प्रमुख जितेंद्र तळेकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तालुकाप्रमुख रवींद्र चव्हाण, गणेश गल्ली मंडळाचे अध्यक्ष लालबाग शाखाप्रमुख किरण तावडे, मीरा-भाईंदर विभाग प्रमुख मधुकर इस्वलकर, ज्येष्ठ शिवसैनिक वामन कुडतरकर, विरार उपशहर प्रमुख जितेंद्र खाडे, तिथवली गावचे गावकर बबन हरयाण, तिथवली शाखाप्रमुख चिंतामणी जैतापकर, ज्येष्ठ शिवसैनिक नारायण तांबे, दिलीप तांबे, मनसे विभाग प्रमुख मधुकर खाडे, ज्येष्ठ शिवसैनिक मोतीराम माने, गणेश कोकाटे, ओमकार इस्वलकर, सुभाष इस्वलकर, अनिल इस्वलकर, प्रकाश इस्वलकर, तुकाराम इस्वलकर, यशवंत इस्वलकर, सुरेश इस्वलकर, यशवंत जैतापकर, राजेंद्र जैतापकर, भावेश जैतापकर, मनिष जैतापकर, कल्पेश जैतापकर, योगेश जैतापकर, राजाराम हरयाण, प्रकाश हरयाण, मंगेश हरयाण, कल्पेश हरयाण, रवी हरयाण, स्वरांत हरयाण, आनंत हरयाण, मोतिराम हरयाण, हर्ष राणे, श्रीपाद घनदाडे, विठोबा गुरव, आयुष गुरव, दीपक गुरव, विजय सावंत, भावेश सावंत, श्रीधर रोग्ये, अजय रोग्ये, धनंजय रोग्ये, सुन्या तावडे, संतोष शिंदे, बाळा इस्वलकर, रिहाना काझी, जानवी हरयाण, लक्ष्मी हरयाण, योगिता इस्वलकर, अंजली इस्वलकर, प्रतीक्षा इस्वलकर, अनिता इस्वलकर, विद्या इस्वलकर, सुजाता जैतापकर, प्रतिभा जैतापकर, सुनिता जैतापकर, सुचिता जैतापकर, मनश्री जैतापकर, स्नेहा जैतापकर, सुरेखा गांधी, प्रीती घनदाडे व आदी कार्यकर्ते महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!