श्री कालिकादेवी मंदिर, बावीचे भाटले, फोंडाघाट न्यासास सार्व. न्यास नोंदणी कार्यालय कडून चौकशीची नोटीस !

हरकती नोंदविण्याचे आवाहन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सार्व. न्यास. नोंदणी कार्यालय कडून सर्व संबंधित लोकांकरिता, श्रीकालिका देवी मंदिर, बावीचे भाटले, फोंडाघाट हा न्यास अस्तित्वात व सार्वजनिक स्वरूपाचा आहे का? अशी विचारणा, चौकशी नोटीस द्वारे करण्यात आली आहे. तसेच या न्यासाची जंगम मिळकत वस्तू रुपात सुमारे रुपये ४८४२०/- आणि मंदिर स्थावर मिळकत सुमारे रुपये वीस लाख एवढी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचा तपशील नोटीशीमध्ये समाविष्ट केला आहे.

या चौकशी प्रकरणात कुणाला काही हरकत नोंदवायची असल्यास ३० दिवसाचे आत लेखी स्वरूपात, पुराव्यासह कार्यालयीन पत्त्यावर पाठवावी. असे अधीक्षक सार्व. न्यास नोंदणी कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!