वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील संभाजी चौकात वैभववाडी पोलिसांनी कार मधून सुमारे ६० हजार ८८० रुपये किंमतीचा गुटखा सदृश पदार्थ जप्त केला आहे. कार चालक उदयकुमार शिनू देवर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास केली. वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस शिपाई रणजित डबडे हे शहरातुन जात असतांना त्यांना संभाजी चौकातून एडगावच्या दिशेने एक कार जाताना दिसली. त्यांनी ही कार थांबावून कारचालक उदयकुमार देवर यांच्याकडे गाडीत काय आहे. याची चौकशी केली. सुरुवातीला इतर साहित्य असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु गाडीतील मालाची तपासणी केली असता, त्यामध्ये तीन प्रकारच्या कंपनीचा गुटखा सदृश पदार्थ तीन चार पिशव्यात आढळून आला. पोलिसांनी ६० हजार ८८० रुपयांचा गुटखा सदृश पदार्थ व ५० हजार रुपये किंमतीची कार असा सुमारे १ लाख १० हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कारचालक मालक उदयकुमार यांच्या विरोधात अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर यापूर्वीही झालेला आहे
वैभववाडी येथे साठ हजार रुपयांचा गुटखा सदृश्य पदार्थ जप्त ; एकावर गुन्हा दाखल











