शिवसेना पक्षाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचा करण्यात आला सत्कार
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शैक्षणिक संस्थेची संचालक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली होती. दरम्यान आज सोमवार दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या नूतन संचालक कार्यकारणीच्या सभेत पुन्हा एकदा या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रवीण दिगंबर लोकरे तर सचिवपदी महेश कोळसुलकर यांची निवड करण्यात आली असून शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने सर्व संचालक मंडळ पदाधिकारी यांचे कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव यांचे शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेची सन २०२५-२६ ते सन २०२९-३० या पुढील पाच वर्षासाठी नवीन कार्यकारणी निवड संस्थेच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत करण्यात आली होती. तर आज झालेल्या संस्थेच्या कार्यकारणी संचालक मंडळाची पदाधिकारी निवड प्रकिया पार पडली. यामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी प्रवीण दिगंबर लोकरे यांची सलग चौथ्यांदा निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी रघुनाथ माधवराव राणे, तर सचिवपदी महेश मधुकर कोळसुलकर व सहसचिव पदी राजेंद्र जयप्रकाश वरूणकर तसेच खजिनदार पदी संदेश पुरुषोत्तम धुमाळे आदीची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक विजय जयराम देसाई, मोहन भास्कर कावळे, भिकाजी केशव कर्ले, आत्माराम देवू कांबळे, प्रशांत धनाजी गुळेकर, दिगंबर अनंत राऊत, गुरुप्रसाद दीपक शिंदे, योगेश सुरेश गोडवे उपस्थित होते.
यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीने संस्थेच्या कार्यालयात जाऊन नवीन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव, खारेपाटण विभागप्रमुख गुरुप्रसाद शिंदे, शहर प्रमुख सुहास राऊत, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेशक संतोष राऊत, शाळेचे ग्रंथपाल यशवंत रायबागकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आजच्या संचालक मंडळ कार्यकारणीच्या पदाधिकारी निवड सभेत संस्थेच्या माजी पदाधिकारी कार्यकारणीलाच पुन्हा एकदा संपूर्ण मान्यता देण्यात आल्याबद्दल संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी यांनी सर्व नूतन सहकारी संचालकांचे आभार मानून सर्वांना शुभेच्छा दिल्या. तर संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे सराव स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.













