गावराई थळकर वाडीतील उबाठा सेना कार्यकर्ते शिदेसेनेत प्रवेश

ओरोस (प्रतिनिधी) : शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे शिवसेना जिल्हाप्रमुख दतासामंत . यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गावराई थळकरवाडी येथील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तसेच भाजपाचे माजी उपसरपंच संजय आयरे सहबाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला.

कुडाळ तालुक्यातील गावराई येथील टेंब वाडी ,कुळकरवाडी, नंतर तिसराथळकरवाडी येथील ठाकरे सेनेच्या विविध कार्यकर्त्यांनी तसेच भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश करून गावच्या विकास कामासाठी आमदार निलेश राणे शिवसेना जिल्हाप्रमुख दता सामंत यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमासाठी शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत,काका कुडाळकर कुडाळ युवा तालुका प्रमुख सागर वालावलकर विभागप्रमख परशुराम परब कसाल सरपंचराजन परब,मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर मंदार पडवळ गावराई शाखाप्रमुख किसन चिंदरकर, मालवण युवा तालुका प्रमुख स्वप्निल गावडे, आदींसह उपस्थित होते

यावेळी युवासेना तालुकाप्रमु यावेळी युवासेना पदाधिकारी निवड नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळीगावरान शाखाप्रमुख किसन चिंदरकर यांना बढती देत विभाग चिटणीस पदी नियुक्ती देण्यात आली तर कसाल विभागप्रमुख साईनाथ आंबेरकर (कसाल), पंचायत समिती कसाल उपविभाग प्रमुख गोविंद फाले, उपविभाग प्रमुख विशाल परब, बळवंत उर्फ रुपेश गावडे यांना युवासेना तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली

आजच्या या प्रवेश कार्यक्रमात भाजपचे ग्रामपंचायत माजीउपसरपंच संजय आयरे यांच्यासह उद्धव ठाकरे सेनेचे रुपेश गावडे, सतीश गावडे, सचिन गावडे,अनु गावडे, ,गोविंद फाले याच्यासह सुमारे ४० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. गावराई गावामध्ये गेली दहा वर्ष विकास कामे झाली नाहीत. गावराई ग्रामपंचायत ते प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, टेंबवाडी कुळकरवाडी, थळकरवाडी कडे जाणारा मुख्यरस्ता वाहतुकिस अतिशय धोकादायक बनला आहे. या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण व्हावे पडवेजोड रस्ता मंजूर करा यासाठी गेली दहा वर्ष प्रयत्न करूनही तसेच अनेक वेळा तत्कालीन आमदारांचे लक्ष वेधूनही याकडे दुर्लक्ष केला गेला. यामुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. कुडाळ मालवण मतदारसंघाचे विद्यमान आमदार निलेश राणे यांच्या कार्यप्रणालीकडे प्रेरित होऊन त्यांच्यामार्फत या रस्त्याचे काम तसेच उर्वरित विकास कामे होऊ शकतील अशी आशा व्यक्त करत येथील भाजप व उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. तर शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ग्रामपंचायत ते टेंबवाडी, कुळकरवाडी, थळकरवाडी मुख्य रस्त्याच्या कामासह अन्य विकास कामेही टप्प्याटप्प्याने पुढील दोन वर्षात पूर्ण केली जातील असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांना दिला व सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आपल्या पक्षात स्वागत केले आजच्या या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे सेना व भाजप पक्षाची ताकद निश्चितच कमी झाली आहे.

error: Content is protected !!