सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांनी ‘डायमंड टॅलेंट सर्च’ परीक्षेला सामोरे जावे : वामन तर्फे

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनतर्फे आदर्श मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन हे आरोग्य, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असून, फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या ‘डायमंड टॅलेंट सर्च (DTS)’ परीक्षेला जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सामोरे जावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांनी केले. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंटची कमतरता नसल्याने त्यांनी स्पर्धा परीक्षांना धैर्याने तोंड द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनतर्फे नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आदर्श मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी श्री. तर्फे बोलत होते.

स्पर्धा परीक्षांसाठी व्यासपीठ
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह रामचंद्र घावरे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. फाउंडेशनच्या या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. केंद्रप्रमुख अनंत राणे यांनीही फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.

अच्युतराव वणवे यांनी स्पर्धा परीक्षांची गरज लक्षात घेऊन ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनने ‘डीटीएस’ स्पर्धा परीक्षेचा एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

फाउंडेशनच्या कार्याला सहकार्याचे आवाहन
सेवानिवृत्त अधिकारी मोहन सावंत यांनी फाउंडेशनच्या ‘डीटीएस’ परीक्षेच्या उपक्रमाला स्तुत्य ठरवले आणि समाजातील सर्व घटकांनी फाउंडेशनच्या कार्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले. फाउंडेशनचे सदस्य शेखर गवस, सत्यवान गावकर व अन्य सहकाऱ्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऋग्वेद हेल्थ फाउंडेशन सक्रियपणे काम करत आहे.

पुरस्कारार्थींचा सन्मान
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रतीक्षा गावडे, दिव्या सावंत, दशरथ शिगांडे, अर्चना देसाई, गायत्री देवळी यांना तर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राजक्ता अवसरे, प्रदीप मांजरेकर, वेदिका चव्हाण, स्नेहल राणे, गायत्री परब यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झालेल्या वेदिका चव्हाण, दिव्या सावंत, गायत्री देवळी, दशरथ शिगांडे आणि अर्चना देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक अच्युतराव वणवे, केंद्रप्रमख अनंत राणे, सेवानिवृत्त अधिकारी मोहन सावंत, कल्पना सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकार तुषार हजारे आणि दर्शन सावंत यांचाही फाउंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला. DTSE बारामती ऑफीस वरून खास सिंधुदुर्गातील विद्यार्थी मित्रांचे शिक्षकांना त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याकरिता बारामती हेड ऑफिस कडून श्री. डोळे, श्री. चव्हाण, श्री. जाधव, श्रीम. इनामदार, श्रीम. गावडे, सौ. भोसले, श्रीम. बहीरमल, श्री. पोमणे आदी उपस्थित होते.

तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी. टी. एस. इ. कॉर्डिनेटर सत्यवान गावकर, शशांक कांबळे,चेतन वरक,शेखर गवस हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून करण्यात आली. दीपक चव्हाण यांनी प्रास्ताविकातून फाउंडेशनच्या आरोग्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील कार्याची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते फाउंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शेखर गवस यांनी केले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

error: Content is protected !!