संदेश पारकर यांचे भावनिक आवाहन
भाजपाकडून मतांसाठी 10 ते 15 हजारांचे वाटप होत असल्याचाही आरोप
कणकवली (प्रतिनिधी) : विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणारे माझे प्रतिस्पर्धी आता नगरपंचायतमध्ये भ्रष्टाचारातून मागील 8 वर्षांत कमावलेले पैसे आता मतदारांना 10 ते 15 हजार रुपये मतांसाठी वाटत असल्याचा आरोप शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी केला. कणकवलीत उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार निलेश राणेंच्या झालेल्या सभेनंतर घाबरलेल्या विरोधकांनी मतदारांना पैशाने विकत घेण्यास सुरुवात केली आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी कणकवलीत निवडणूक होत आहे. माझा कणकवलीच्या जनतेवर विश्वास आहे. स्वाभिमानी बाण्याचे कणकवलीकर मतदार अशा पैशाच्या बाजाराला विकला जाणार नाही. भाजपाच्या भ्रष्ट टोळीला त्यांची जागा मतदारच दाखवून देतील. माझी ही नगरपंचायतची शेवटची निवडणूक आहे. एक संधी मला द्या. शहराच्या परिवर्तन साठी एक संधी द्या, असे आवाहन संदेश पारकर यांनी केले.












