रमेश चव्हाण यांना भारतरत्न सरदार पटेल हिंदूरत्न पुरस्कार प्रदान

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुटाट गावचे सामाजिक कार्यकर्ते रमेश चव्हाण यांच्या कला, क्रीडा, सामाजिक कार्य आणि सेवाभावी वृत्तीची दखल घेऊन त्यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदूरत्न राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट, क्रीडा मंत्रालय-केंद्र सरकार व निती आयोग संलग्नित डॉ. रविंद्र भोळे आरोग्य केंद्र यांच्या वतीने हा मानाचा सन्मान प्रदान झाला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा राज्यसभा खासदार प्रा.डॉ.मेघाताई कुलकर्णी, मणिभाई मानव सेवा ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष डॉ.रविंद्र भोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेघा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात रमेश चव्हाण यांनी ‘लोहपुरुष पटेल यांच्या 150 व्या जयंतीदिनी मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे,’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

रमेश चव्हाण यांनी कला-क्रीडा क्षेत्रातील योगदानाबरोबरच अपघातातील रुग्णांना मदत, जखमी पशुपक्ष्यांचे उपचार, क्रिकेट स्पर्धांत विना-मोबदला पंच म्हणून सेवा, कौटुंबिक समस्या निवारण्यासाठी समुपदेशन, त्याचप्रमाणे 32 वेळा रक्तदान आणि एचआयव्ही प्लस मुलाचे दत्तक संगोपन व शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. अशी अनेक समाजाभिमुख व लोकाभिमुख उल्लेखनीय कामे त्यांनी केली आहेत. या सन्मानानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!