कणकवली (प्रतिनिधी) : पैसे वाटून मते घेणे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा विचारधारा नाही. मालवण मध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांच्या घरात सापडलेले लाखो रुपये ही आरएसएस च्या विचारधारेविरोधात आहे. लोकशाहीला हा काळिमा आहे. कणकवलीत सुद्धा भाजपाकडून मतांसाठी पैसेवाटप सुरू आहे. हेच पैसे वाटून नंतर बोगस विकासकामे करतात. भले विरोधकांनी पैसे वाटले तरी शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर हेच नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील. भाजपाकडून आलेले पैसे घेतले नाही तर आमच्याबद्दल आकस ठेवतील, आम्ही भाजपाकडून पैसे घेऊन मते संदेश पारकर नाच देणार अशा प्रतिक्रिया कणकवलीकर मतदारांतून व्यक्त होत असल्याचे शहर विकास आघाडीचे नेते सतीश सावंत म्हणाले.
कणकवलीत भाजपाकडून पैसे घेऊन मतदार संदेश पारकरना मतदान करणार – सतीश सावंत












