कणकवली (प्रतिनिधी) : जर विकासकामे केली म्हणता तर मतदारांना मतांसाठी पैसे का देता ? भाजपाच्या गोटात भिती असल्यामुळे मताला 10 हजार प्रमाणे पैसे वाटत आहेत. कणकवलीत एका घरात असे पैसेवाटप करताना घरातील माणसांनी त्यांची खरडपट्टी काढल्याची घटना आहे. कोकणात आतापर्यंत नगरपंचायत च्या निवडणूकीत आजवर मतांसाठी दिली जात असलेली, कणकवली नगरपंचायत मधील ऐकलेली रक्कम पहिलीच आहे. जनतेला पैशांचे आमिष दाखवून भयभीत करणे चुकीचे आहे. निलेश राणेंनी मालवणमध्ये केलेली पोलखोल डोळ्यात अंजन घालणारी आहे. विजय केनवडेकर हे संघाचे कार्यकर्ते आहेत. पण मंतांसाठी पैसेवाटप ही संघाची शिकवण नाही. कणकवलीत घरालगत तुटपुंज्या असलेल्या जमिनीवर भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी आरक्षण टाकले आहे. ग्रामीण भागातील प्रभाग 1, प्रभाग 3 मधील नागरिकांच्या आरक्षण बाबत च्या अडचणी आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून सोडविणार आहोत. मालवण मध्ये घडलेल्या पैसे वाटप ची घटना कणकवलीत होऊ नये. निवडणूकीदरम्यान कुठेही सामाजिक शांतता बिघडणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी असे माजी आमदार राजन तेली म्हणाले.
भाजपाच्या गोटात कणकवलीत पराभवाची भिती ; म्हणून मतांसाठी 10 हजार वाटप – राजन तेली












