ओरोस जिल्हा क्रीडा संकुलात ३० रोजी १४ आणि १६ वयोगटातील मुलींसाठी “अस्मिता लीगचे” आयोजन

सिंधुदुर्ग जिल्हा अथलॅटिक्स असोसिएशनची माहिती

तळेरे (प्रतिनिधी) : अस्मिता लिग ही अथलॅटिक्स मीट गव्हर्मेंट ऑफ इंडिया, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, अथलॅटिक्स फेडरेशन ऑफ इंडियायांच्यावतीने टॅलेंट सर्च 14 आणि 16 वर्षाच्या खालील मुलीं साठी उत्कृष्ट अथलॅटिक्स निवड चाचणी आयोजित करण्यात आले आहे .ही जबाबदारी अथलॅटिक्स असोसिएशन सिंधुदुर्ग वर सोपविण्यात आली आहे.

ही स्पर्धा 30 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल ओरोस ता. कुडाळ येथे सकाळी 8.00 पासून सुरु होईल. संपूर्ण भारतातून 300 जिल्हे या अस्मिता लिगसाठी निवडण्यात आले असून त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड झाली आहे.या करिता अथलॅटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाकडून 3 अधिकारी खेळाडूंची निवड करण्यासाठी येणार आहेत.या स्पर्धेतून मुलींना आंतर जिल्हा राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड केली जाईल.

14 वर्षाखालील मुलीं करिता पुढीलप्रमाणे
( जन्मतारीख. 21_12 2011 तें 20_21_2013 या कालावधीत जन्म झालेला असावा.)
इव्हेंट पुढील प्रमाणे.
Trayathlon A
60 मी धावणे, लांब उडी (5 मी. अप्रोच रन )उंच उडी
Trayathlon B
60 मी. धावणे, लांब उडी ( 5 मी अप्रोच रन), shot put 1 kg बॅक throw.
Traithlon C
60 मी. धावणे, 600 मी. धावणे,
लांब उडी (5 मी अप्रोच रन)
या पैकी एक ट्रायथलोन आणी kids javelin हा इव्हेंट प्रत्येक खेळाडूस करावा लागेल
16 वर्षाखालील मुलीं साठी (जन्मतारीख… 21_12_2009 तें 20_ 12 _2011. या कालावधीत जन्म झालेला असावा.)
16 वर्षा खालील मुलीं करिता इव्हेंट्स पुढील प्रमाणे.
60 मी धावणे
600 मी. धावणे
लांब उडी
उंच उडी
गोळा फेक( स्टँडिंग थ्रो)
थाळी फेक
भाला फेक ( 10 मी. अप्रोच ran)
एका खेळाडूस कोणत्याही 2 इव्हेंट मध्ये सहभाग घेता येईल.
मुलीं साठी कोणतीही एन्ट्री फी नाही

ज्या शाळेतील जास्तीतजास्त मुलीं सहभागी होतील आशा 3 शाळांना आकर्षक ट्रॉफी देण्यात येईल सदर स्पर्धेत जास्तीतजास्त मुलींनी सहभागी व्हावे. असे आवाहन ॲथलॅटिक्स असोसिएशनच्या साचिव कल्पना तेंडुलकर, अध्यक्ष रणजित सिंग राणे, स्पर्धा आयोजन सचिव बाळकृष्ण कदम यांनी केलें आहे.

error: Content is protected !!