आचरा सिमांबा रामेश्वर सोसायटीत येथील घटना
आचरा (प्रतिनिधी) : आचरा सिमांबा येथील रामेश्वर विकास सोसायटीच्या आवारात शुक्रवारी भर दुपारी बिबट्या घुसल्याने येथील वस्ती करणा-या ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांची चाहूल लागताच बिबट्याने नितिन कृष्णा गावकर यांच्या घराच्या परीसरात झेप अंगणात दाखल झाला होता. ग्रामस्थांची चाहूल लागताच बिबटयाला बाजूच्या जंगलमय परिसरच्या दिशेने निघून गेला. बिबटया निघून नेल्याने ग्रामस्थांमधून सुटकेचा निःश्वास सोडला आला.
दुपारी जेवण आटोपून आपल्या घराच्या गॅलरीत बसलेल्या अनुष्का मुननकर हिच्या नजरेत सोसायटीच्या मुख्य रस्त्याने चालत जाणारा बिबट्या पडताच त्यांनी सासरे गणपत मुननकर यांना सांगितले. याच दरम्यान विरुद्ध बाजूने येणा-या मोटारसायकल च्या आवाजाने बिबट्याने वाट सोडून नितीन गावकर यांच्या घराच्या आवारात उडी घेत अंगणात उतरला होता. घरात भाड्याने राहणाऱ्या राठोड कुटूंबीयांनी बिबटया समोर असल्याचे बघून तात्काळ घराचे दरवाजे बंद करून घेतले. भर दिवसा सोसायटीच्या आवारात बिबट्या घुसला असल्याचे रहिवाशांनी पत्रकार परेश सावंत यांना संपर्क करत याबाबत वनविभागास खबर देण्यात सांगितले त्यानंतर सावंत यांनी वन विभागाला संपर्क करत घटनेची माहिती दिली. वनविभागाची टीम आचरा येथे दाखल झाली होती. घराच्या परीसरात बिबट्या च्या पायाचे ठसे उमटलेले दिसून येत होते. बिबटयाची खबर कळताच आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा पत्रकार अर्जुन (दादा) बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, सचिन गावकर, गिरीश घाडी उदय बापर्डेकर यांनी भेट दिली होती. यावेळी सोसायटीचे अन्य रहिवासी उपस्थित होते.











