सहकार महर्षी कै. प्रा. डी.बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीप्रित्यर्थ आभाळमाया ग्रुपचे आयोजन
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची प्रमुख उपस्थिती
चौके (प्रतिनिधी) : सहकार महर्षी कै. प्रा. डी.बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ उद्या रविवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९:०० ते ३:३० या वेळेत वराडकर हायस्कुल कट्टा येथे आभाळमाया ग्रुप, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, स्मिता कॉम्प्युटर एज्युकेशन व जी एच फिटनेस कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबरोबरच नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिर, व श्री रामेश्वर क्लिनिक कट्टा यांच्यातर्फे मोफत इसीजी तपासणी केली जाणार आहे. तसेच या निमित्ताने कट्टा पंचक्रोशीतील ज्येष्ठ भजनी बुवांचा सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ‘कोकणी माणूस’ प्रसिद्ध असलेले प्रसाद गावडे यांचीही प्रमुख उपस्थिती या रक्तदान शिबिरात दरम्यान राहणार असून ‘निसर्ग जीवनशाळा’ या विषयावर ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
तरी ह्या भव्य रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्वश्रेष्ठ दान रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा तसेच इतर शिबिरांचाही सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आभाळमाया ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.












