भाजपाची प्रचाराची महारॅली | सावंतवाडीकरांचा महाप्रतिसाद

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज सावंतवाडी शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. राजवाडा येथील पाटेकर देवस्थानचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण शहरात ही रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीत सहभागी होऊन सावंतवाडी बाजारपेठेतील व्यापारी तसेच ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले यांसह भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी तसेच नागरिकांनी प्रचार रॅलीला उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद देत शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले यांसह नगरसेवक पदाचे उमेदवार व भाजपा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!