खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावातील नागरिक व खारेपाटण गाव महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष तथा युवा कार्यकर्ते श्री प्रणय गुरसाळे यांनी नुकतेच आपले दिवंगत वडिल श्री प्रकाश गुरसाळे यांच्या स्मरणार्थ खारेपाटण पंचशील नगर येथील “बुद्ध विहारा” करिता स्टील कपाट भेट म्हणून दिले.
यावेळी प्रणय गुरसाळे यांच्या पत्नी अंकिता गुरसाळे, आई -संगीता गुरसाळे उपस्थित होते.खारेपाटण बुद्धविहार येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर,मंडळाचे सचिव सागर पोमेडकर,मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर,युवा कार्यकर्ते श्रवण पाटणकर, ललित पाटणकर,आशिष पोमेडकर यांसह संघमित्रा महिला मंडळ खारेपाटणच्या सचिव स्निग्धा पोमेडकर,महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा आकांक्षा सौ आकांक्षा पाटणकर,सायली तुरळकर, अंगणवाडी सेविका सविता पाटणकर,मदतनीस सुनीता शेवडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.सौ नम्रता जुमलेकर,आदी मान्यवर यावेळी उपस्थितीत होते.
प्रणय गुरसाळे यांनी आपल्या सामाजिक दातृत्वातून यापूर्वी देखील खारेपाटण बुद्धविहारासाठी भिंतीवरील मोठे घड्याळ भेट दिले होते.तर आता पुन्हा खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहार करीता मोठे कपाट भेट म्हणून दिले.तर पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या वतीने गुरसाळे कुटुंबियांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी मंडळाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले.












