शेतकऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष ? चालू वर्षी ई-पीकला त्वरित स्थगिती द्या. गेल्या वर्षीच्या सातबारावर चालू वर्षा च्या योजना राबवा..
पालकमंत्र्यांना साकडे !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : चालू वर्षी पिक पाहणी मध्ये एरर येत असल्याने, शासनाच्या विविध योजनांची नोंदणी करताना, विविध अडचणी येत आहेत. ईपीक पाहणी पूर्ण होत नाही. पर्यायाने सन २५/२६ च्या सातबारावर खरीप हंगाम, भात पीक, आंबा काजू पिकाची नोंद न झाल्याने, शेतकऱ्यांचे भात विक्रीकरिता रजिस्ट्रेशन न झाल्याने, सोसायटीला शेतकऱ्यांकडून भात खरेदी करता येत नाही. तशीच बाब फळ पिक विमा करिता, इ पीक नसल्याने विमा उतरवता येत नाही. त्यामुळे पंचक्रोशीतील किंबहुना जिल्ह्यातील ९०% शेतकरी< बागायतदार चालू वर्षी भात खरेदी< आंबा काजू पिक विमा यापासून वंचित राहणार आहेत. याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सन २४/२५ मध्ये सहज सरकारी ॲपवरून ईपीक झाले असताना, चालू वर्षीच हा एरर म्हणजे शासनाचा भोंगळ आणि बेजबाबदार कारभार आहे. असा संताप शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
याबाबत मा. जिल्हाधिकारी, प्रांत, तलाठी, सर्कल, कृषी विभाग, पणन विभाग, जमाबंदी आयुक्त ३ वेळा मुदतवाढ देऊन सुद्धा हतबल आणि मूग गिळून गप्प आहेत. याबाबत कृषी आयुक्तांनी पालकमंत्री यांना,29 नोव्हेंबर रोजी कृषी अप्पर मुख्य सचिव यांना पत्राद्वारे सण २५/२६ मध्ये शासनाच्या योजना मुळे नुकसान भरपाई पात्र शेतकरी वंचित राहू नये याकरिता ईपीक पाहणी अट फळ पिक विमा भात धान खरेदी व पिक विमा करिता शिथिल करणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकरी, बागायतदारांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यास शासन स्तरावरून मान्यता मिळावी असे कळविले आहे.
याबाबत मा पालकमंत्री यांनी गांभीर्याने लक्ष घालून कृषीमंत्री व संबंधितांचे लक्ष वेधून सन २५/२६ करिता इपिक त्वरित स्थगित करण्याचे आदेश, कार्यालयांना द्यावेत व भात खरेदी चालू करून शेतकरी व बागायतदारांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. स्थगितेच्या आदेशाची सर्वजण वाट पाहत असल्याने वंचित राहण्याची वेदना सर्वत्र व्यक्त होत आहे..












