सिंधुदुर्गातील प्रमुख स्थानकांना थांबे
कणकवली (प्रतिनिधी) : हिवाळा आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर तीन विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या गाड्यांना सिंधुदुर्गातील काही प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
सीएसएमटी – करमळी विशेष (०११५१/०११५२) सीएसएमटी करमळी (०११५१/०११५२) ही गाडी १९ डिसेंबर २०२५ पासून ते ५ जानेवारी २०२६ या काळात दररोज धावणार आहे. ०११५१ सीएसएमटीहून रात्री १२.२० वाजता सुटेल आणि करमाळीला त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात, ०११५२ करमळीहून दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांवर थांबेल. लोकमान्य टिळक (टी) -थिरुवनंतपुरम उत्तर विशेष (०११७१/०११७२)
लोकमान्य टिळक (टी) थिरुवनंतपुरम उत्तर विशेष (०११७१/०११७२) ही साप्ताहिक गाडी १८ डिसेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६ दरम्यान धावणार आहे. ०११७१ लोकमान्य टिळक (टी) येथून दर गुरुवारी दुपारी ४ वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम उत्तर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.३० वाजता पोहचेल. तर, ०११७२ दर शनिवारी थिरुवनंतपुरम उत्तर येथून दुपारी ४.२० वाजता सुटेल आणि ही ट्रेन मध्यरात्री १ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल. या गाडीचे कोकण भागातील थांबे ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमाळी येथे असतील. लोकमान्य टिळक (टी) मंगळुरू जंक्शन विशेष (०११८५/०११८६)
लोकमान्य टिळक (टी) मंगळुरू जंक्शन विशेष (०११८५/०११८६) ही साप्ताहिक गाडी १६ डिसेंबर २०२५ ते ६ जानेवारी २०२६ दरम्यान दर मंगळवारी धावेल. ०११८५ ही गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून मंगळवारी दुपारी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५ वाजता मंगळुरू जंक्शन येथे पोहचेल. ०११८६ मंगळुरू जंक्शन येथून बुधवारी दुपारी १ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहचेल. कोकण मार्गावर ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन येथे थांबणार आहे.












