खरे सौंदर्य हे बाह्य रूपात नसून अंतर्मनात दडलेले असते – संजय वेतुरेकर

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली शिक्षण संघ मुंबईचे, कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. मंगळवार, दि.२ डिसेंबर २०२५ रोजी प्रशालेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन स्कूल कमिटी चेअरमन के. आर. दळवी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे संजय वेतुरेकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी वेतुरेकर सरांनी खरे सौंदर्य हे बाह्य रूपामध्ये नसून ते आपल्या अंतर्मनांत लपलेले असते आपले विचार, आपला दृष्टिकोन, सदैव सकारात्मक ठेवा तर तुम्ही खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी व्हाल स्वतःचा आनंद मिळवण्यासाठी जगा असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना देत सकारात्मक विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांच्या अप्रतिम व्याख्यानाने सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार देण्यात आले. यावेळीचा मानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार संजय कृष्णा सावळ यांना प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार हा कै.अर्जुन श्रीधर दळवी यांच्या स्मरणार्थ दिनेश अर्जुन दळवी यांनी प्रायोजित केला आहे. तर सूर्यकांत दळवी प्रायोजित यावर्षीचा आदर्श पालक पुरस्कार हा अनिल एकनाथ सावंत यांना देण्यात आला. शुभदा देसाई स्कूल कमिटी सदस्या प्रायोजित आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार श्रीकांत आबा कावले लिपिक यांना देण्यात आला. संपूर्ण प्रशालेतून आदर्श विद्यार्थी पुरस्काराने कु.रसिका नंदन गावकर हिला गौरविण्यात आले. याचप्रमाणे प्रशालेतून आदर्श स्वयंसेवक म्हणून कु. गौरेश महेश मेस्त्री याला सन्मानित करण्यात आले.याचबरोबर एस.एस. सी. व एच. एस.सी. परीक्षेमध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी तसेच प्रशालेमध्ये आयोजित निबंधस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शालेय क्रीडा स्पर्धा, गीत-गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इ. मध्ये विशेष यश प्राप्त विद्यार्थ्यांचा पारितोषिके देवून गुणगौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये सूर्यकांत राजाराम दळवी- (अध्यक्ष कळसुली शिक्षण संघ, मुंबई), श्रीधर विष्णू दळवी- (सल्लागार व माजी अध्यक्ष – कळसुली शिक्षण संघ, मुंबई , जय मारुती दळवी- (सचिव-कळसुली शिक्षण संघ मुंबई मुंबई), रजनीकांत सावंत (सदस्य -स्कूल कमिटी), शुभदा देसाई (सदस्या- स्कूल कमिटी), अनिल एकनाथ सावंत- (अध्यक्ष – शाळा व्यवस्थापन समिती), विश्वास राजाराम दळवी, मिलिंद चंद्रकांत दळवी, चंद्रकांत देसाई, हनुमंत दळवी, शिवाजी गुरव, प्रदीप सावंत उद्योजक, प्रभाकर अंकुश दळवी, दिलीप सावंत, रामचंद्र सावंत, दिवाकर दळवी, शिवप्रसाद घाडीगावकर, शंकर दळवी, लक्ष्मण दळवी, प्रियांका देसाई, श्वेता दळवी, श्रीम. कवडे मुख्याध्यापिका जि.प.शाळा नं.1, चंद्रसेन गोसावी-माजी वरीष्ठ लिपिक, रोहिणी वायंगणकर सिद्धी सावंत, रसिका सावंत, जान्हवी देसाई, रश्मी देसाई, सारिका कदम पोलिस पाटील, रिया नाईक पोलिस पाटील, कोमल राऊत. आजी-माजी विद्यार्थी पालक ग्रामस्थ इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेख-कथा-कविता इ. साहित्यिक लेखन तसेच विविध चित्रे असलेले हस्तलिखित ‘कळस’ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजनाने करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी सुमधूर आवाजात ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक व्ही.व्ही.वगरे यांनी प्रशालेच्या विविध उपक्रमांची माहिती देत या कार्यक्रमाचा उद्देश आणि स्वरूप विशद केले. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक एस के.सावळ यांनी वर्षभरातील घडलेल्या ठळक घडामोडींच्या अहवालाचे वाचन केले व विविध आंतर तसेच शालाबाह्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, स्पर्धा परीक्षा यांतील विद्यार्थ्यांच्या यशाच्या संपादणूकीचे सादरीकरण केले. मान्यवरामध्ये मनोगत व्यक्त करताना एस.व्ही.दळवी, जय दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर सूर्यकांत दळवी यांनी संस्थेच्या प्रदीर्घ यशस्वी वाटचालीमध्ये संस्था पदाधिकारी, मुंबई स्थित संस्था सदस्य, आजी-माजी विद्यार्थी पालक, ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यांचे प्रेम आणि सहकार्य असेच सदैव सोबत रहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुंबई स्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.आपल्या अध्यक्षीय भाषणात के. आर. दळवी यांनी शाळेचा गुणवत्ता पूर्ण निकाल हे शाळेचे अंतरंग असून विविध शाला पूरक कार्यक्रम हे शाळेचे बाह्यांग आहे आणि विद्यार्थी विकासासाठी या दोन्ही अंगांचा विकास होणे आवश्यक आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले तसेच उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाचा व संधीचा योग्य वापर करून आपला उत्कर्ष साधावा असा मोलाचा संदेश दिला.या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची व आभार प्रदर्शनाची धुरा ए. जी. सावंत यांनी सांभाळली.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात संध्याकाळी ‘श्रेष्ठ आमुची ही वीरभूमी’ या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शन कार्यक्रम सदर करण्यात आला. यामध्ये लावणी नृत्य, शेतकरी नृत्य, कोळी नृत्य याचबरोबर विविध नृत्यप्रकारांची झलक असलेले विविधांगी कार्यक्रम, संत गोरा कुंभार छत्रपती शिवाजी महाराज आधारित नाटिका, गीत गायन, यात्रा, असे विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. यावेळी सादर केलेले मुलांचे दशावतार नाटक रसिक प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. या कार्यक्रमाचे रात्रीच्या सत्रातील सूत्रसंचालन कु. मेघा दळवी, कु. प्रांजल परब, कु. श्रावणी राणे आणि कु. भूमी पाडावे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच या कार्यक्रमाचे आयोजक व मार्गदर्शक मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थ्यांनी यांच्याकडून कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक अमर पवार- सांस्कृतिक विभाग प्रमुख, कु. स्मित कदम शालेय स्वराज्य सभा – मुख्यमंत्री यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या सांस्कृतिक रंगमंचासाठी प्रायोजक म्हणून प्राणजीवन सहयोग संस्था, शिरवल याचे संस्थापक अध्यक्ष संदीप चौकेकर यांचे योगदान लाभले. या कार्यक्रमासाठी अनेकांनी आर्थिक साहाय्य केले तसेच बक्षिसे दिलीत अश्या सर्व दानशूर व्यक्तींचे सांस्कृतिक विभाग प्रमुख व प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी आभार प्रकट केले. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक अमर पवार यांनी मार्गदर्शक व सहकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांचे हृदयपूर्वक आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!