सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिधुदुर्ग यांच्यावतीने राज्यस्तरीय शालेय कुस्ती (14 वर्षा आतील मुले व मुली) स्पर्धेचे जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग (बॅडमिंटन हॉल) येथे संपन्न झाल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी दिली.
या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्धाटन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या हस्ते पार पडल्या. या उद्धाटन कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, महिला व बालविकास अधिकारी बापू शिनगारे व जिल्हा क्रीडा अधिकारी, नीलिमा अडसूळ उपस्थितीत होत्या.
राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचा बक्षीस समारंभ जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आबा काळे, सिंधुदुर्ग जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सचिव दाजी रेडकर यांच्या हस्ते संपन्न झाले.या राज्यस्तीय कुस्ती स्पर्धेचे जिल्हा क्रीडाकार्यालयामार्फत यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते.











