माऊली कर्णबधिर विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा रेखाताई गायकवाड यांचा मानवाधिकार दिनी सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : १० डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुका संघटनेच्या वतीने माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय आरोस- दांडेली, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती रेखाताई गायकवाड यांचा संघटनेच्या वतीने सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला.

तसेच या विद्यालयातील कर्णबधिर व मूकबधिर ७० विद्यार्थ्यांना संघटनेच्या वतीने ब्लॅंकेट व खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा उपाध्यक्ष तन्वीर खतीब, जिल्हा महिला संघटक सौ. शिवानी पाटकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष सोहन शारबिंद्रे, कार्याध्यक्ष सौ. मोहिनी मडगावकर, सह सचिव नितीन नाईक, सावंतवाडी तालुका महिला संघटक सौ. रेश्मा परब, उद्योजक महेंद्र चव्हाण, सौ.पूजा नाईक, सानिका मडगावकर, सौ.सुमेधा मडगावकर, डॉ.सौ.अर्चना चव्हाण तसेच विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

error: Content is protected !!