खांबाळे गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे गावात जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, सरपंच प्राजक्ता कदम यांच्या हस्ते श्रीपळ वाढवून करण्यात आले.

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे खालील कामे मंजूर झाली आहेत :-
1) खांबाळे-टेंबवाडी सोमा पवार यांच्या घराकडून खांबदेव मंदिरापर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे.
2) मधलीवाडी सदाशिव पवार यांच्या घरासमोरून भोवरकोंड मार्गाचे खडीकरण–डांबरीकरण करणे.
3) साळुंखेवाडीतील उर्वरित रस्त्याचे खडीकरण–डांबरीकरण करणे.
4) खांबाळे-बौद्धवाडी सार्वजनिक स्मशान भूमी सुशोभिकरण करणे.
5) खांबाळे-धनगरवाडी हेदिचा टेंब उर्वरित रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.
या महत्त्वाच्या रस्ते विकासकामांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, श्री देवी आदिष्टी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन प्रविण गायकवाड, तंटामुक्त समिती अध्यक्ष लवू पवार, बूथ अध्यक्ष महेश चव्हाण, माजी सरपंच विठोबा सुतार, सोसायटी माजी चेअरमन दीपक चव्हाण, जेष्ठ ग्रामस्थ राजाराम तुकाराम पवार, अशोक पवार, रामदास पवार, माजी उपसरपंच उमेश पवार, गणेश पवार, जगदीश पवार, महादेव पवार, नारायण पवार, शांताराम पवार, संकेश पवार, जयेश पवार, दिनेश पालकर, सुरेश पवार, ग्रामपंचायत सदस्य दर्शना मोरे, तसेच तायाराम पवार, विलास साळुंखे, राजन साळुंखे, अनंत वळंजू, तुकाराम गायकवाड, श्रीकृष्ण पवार, बबन पवार, अक्षय पवार, रोहित पवार, प्रथमेश साळुंखे, महेश गायकवाड, राजेश पवार, शरद पवार, रविंद्र पवार, रविंद्र पाताडे आदी उपस्थित होते. या विकास कामांमुळे खांबाळे गावातील रस्त्यांची सुविधा सुधारेल. ग्रामस्थांनी या कामांचे स्वागत करून समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!