हरकुळ बुद्रुक उबाठा च्या ग्रा.पं सदस्या प्राची मेस्त्री भाजपात दाखल

पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांचा उबाठा सेनेला आणखी एक हादरा

हरकुळ (बु.) ग्रा.पं मध्ये 11 पैकी 7 ग्रा पं सदस्य भाजपाचे ; ग्रा.पं वर भाजपाचे वर्चस्व

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील हरकुळ ( बु.) ग्रामपंचायत च्या उबाठा सेनेच्या ग्रामपंचायत सदस्या प्राची प्रवीण मेस्त्री यांनी आज माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे हरकुळ बुद्रुक गावात उबाठा सेनेला आणखी एक हादरा बसला आहे. पालकमंत्री नितेश राणेंच्या विकासकामांचा झंझावात लक्षात घेता गावविकासासाठी आपण भाजपात पक्षप्रवेश करत असल्याचं यावेळी प्राची मेस्त्री म्हणाल्या. एकूण 11 ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये आता भाजपाची ग्रा.पं सदस्य संख्या 7 झाली असून ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे वर्चस्व निर्माण झाले आहे. पक्षप्रवेशावेळी बाबा वर्देकर, ,राजू पेडणेकर, चना परब, अनिल खोचरे, निलेश तेली, बाळा गावकर, गणेश हिवाळेकर, इम्रान शेख, अतुल मेस्त्री, अमर घाडी, सुनील मेस्त्री उपस्थित होते.

error: Content is protected !!