शिवसेना उ.बा.ठा.गटाचे तालुका प्रमुख मंगेश लोके यांचा आरोप
अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल या आशयाचे पोलिस प्रशासनाला निवेदन
वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी शहरात अनेक ठिकाणी राजरोसपणे आपल्या पोलीस खात्याच्या डोळ्यासमोर अवैद्य मटका धंदा सुरू आहे हे धंदे गेली अनेक वर्षे वैभववाडी शहरात चालू आहेत. कोणीतरी तक्रार केली की तात्पुरती कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याचा दाखवला जातो परंतु लगेचच दुसऱ्या दिवशी हे धंदे राजरोसपणे पुन्हा सुरू होतात गेल्या दोन महिन्यापूर्वी काही नवीन मटका धंदे चालू झाल्याची माहिती मिळाली आहे व अशा प्रकारची चर्चा संपूर्ण शहरभर आहे. हे नवीन धंदे विद्यमान नगरपंचायतीच्या काही आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत. काही सत्ताधारी वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या पाठबळामुळेच हे धंदे सुरू आहेत. त्यामुळे आपले कोण काही करणार आहे.! अशा अविर्भावात हे धंदेवाले बिनधास्तपणे तालुक्यातील गोरगरिबांचे संसार उध्वस्त करीत आहेत. यामध्ये तालुक्यातील अनेक बेरोजगार युवक त्याचप्रमाणे कर्मचारी वर्ग, अल्पवयीन मुले हे सुद्धा या मटक्याच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्या पुढील जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गोव्यातील बनावट दारू सुद्धा वैभववाडी शहरातील बियर बार मध्ये विकली जात आहे तरी शहरातील या मटका धंदा व बनावट दारू यांचा आपल्याकडून शोध घेऊन लवकरच या अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उ.बा.ठा. गटाच्या वतीने वैभववाडी पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. आपण या अवैद्य धंदे व मटका धंद्यांवर योग्य ती कारवाई केली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे उग्र आंदोलन व छेडण्यात येणार आहे अशा इशाऱ्याचे निवेदन शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख शिवाजी राणे व तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी वैभववाडी पोलीस निरीक्षक खंडागळे यांनी दिले आहे.













