चौके (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्ग आयोजित नाथपंथी गोसावी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव आणि वार्षिक स्नेहमेळावा गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९:३० ते सायं ४:०० या वेळेत सिद्धिविनायक हॉल, कुडाळ येथे नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्गचे अध्यक्ष भालचंद्र गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निरूखे, ता. कुडाळ येथील उद्योजक निलेश नारायण गोसावी हे उपस्थित राहणार आहेत. याबरोबच नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष/सचिव, कोकण विभाग नाथपंथी महासंघ अध्यक्ष/सचिव, शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या स्नेहमेळाव्या मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान, समाजभूषण सन्मान मूर्तींचा परिचय व सत्कार, महिलांसाठी हळदीकुंकू असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व नाथ बांधव भगिनींनी व विद्यार्थ्यांनी या समारंभास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्ग कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.










