अभिनेता निवेदक निलेश पवार यांना मातृशोक
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील निर्मला सदानंद पवार (वय ७२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. पनवेल येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेते अन प्रसिध्द निवेदक निलेश पवार यांच्या त्या आई होत. निर्मला पवार यांनी प्रशासकीय सेवेत मोठी कामगिरी केली होती.१९७५ ते २०१२ या कालावधीमध्ये त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये आपले योगदान दिले.पुरवठा शाखा संजय गांधी निराधार योजना, या टेबल अंतर्गत त्यांनी सेवा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैभववाडी कणकवली आणि सिंधुदुर्ग नगरी या ठिकाणी त्यांच्या प्रामाणिक सेवेची छाप सर्वसामान्यांमध्ये पडली. तहसील कणकवली इथून अव्वल कारकून म्हणून त्या निवृत्त झाल्या होत्या. निवृत्तीनंतरही त्या समाजसेवेत हिरीरीने पुढे असायच्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे एक मुलगी दोन सुना, जावई तीन नातवंडे असा परिवार आहे.
पुण्यानुमोदन आणि शोकसभा कार्यक्रम रविवार दिनांक २८ डिसेंबर सकाळी दहा वाजता भगवती हॉल कणकवली येथे होणार आहे.










