आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालयाच्या NSS श्रमसंस्कार शिबिराचे पळसंब येथे भव्य उद्घाटन

आचरा (विवेक परब) : आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आचरा महाविद्यालय, आचरा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने पळसंब ग्रामपंचायत येथे आयोजित निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन उत्साहात पार पडले.या शिबिराचे उद्घाटन पळसंब गावचे प्रभारी सरपंच अविराज परब यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य नितेश सारंग, पळसंब ग्रामपंचायतचे माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, श्री जयंती देवी सांस्कृतिक, कला, क्रिडा मंडळ पळसंब चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष उल्हास सावंत, तसेच राजन पुजारे, प्रमोद सावंत, मेघाशाम जुवेकर, पुनम गोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
NSS कार्यक्रम अधिकारी. अच्युत कांबळी प्रास्ताविकेत असं म्हणाले अशा शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते व महाविद्यालयात अशा विविध कार्यक्रमांमुळे विद्यार्थी एक संघटनेने काम करतात भविष्यात समाजात वावरताना त्यांना अशा गोष्टीची जाणीव होऊन योग्य ती दिशा मिळण्यास मदत होते

उद्घाटन प्रसंगी बोलताना मा. उल्हास सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात श्रमसंस्काराचे महत्त्व अधोरेखित करत योग्य मार्गदर्शन मिळाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी भविष्यात क्लास वन अधिकारी होऊन समाजाला योग्य दिशा देतील, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर होते. मोबाईल व इंटरनेटच्या युगात संस्कारांची गरज अधिक भासते असून, अशा शिबिरांमधून विद्यार्थ्यांना जीवनाला योग्य दिशा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक विभागप्रमुख सौ. प्रियांका हिंदळेकर, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक सौ.भावना मुणगेकर, हर्षदा महाजन व विरेश चव्हाण तसेच गणपत परब, मनाली सारंग आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.श्रम, सेवा आणि संस्कार यांची त्रिसूत्री जपणारे हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

error: Content is protected !!