ह्यूमन राईट मालवण तालुका संघटनेने जपले निसर्ग भान..!

लक्ष्मीबाई टोपीवाला कन्या शाळा मालवण येथे १० वृक्षांचे वृक्षारोपण

आचरा (प्रतिनिधी) : ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कोकण विभाग, सिंधुदुर्ग आणि मालवण तालुका संघटनेच्या वतीने मालवण येथील लक्ष्मीबाई टोपीवाला कन्या शाळेच्या आवारात संघटनेच्या वतीने विविध प्रकारच्या दहा वृक्षांचे वृक्षारोपण करून निसर्गाप्रती कृतज्ञता दाखवून दिली.

यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा महिला संघटक सौ.मिनल पार्टे, मालवण तालुकाध्यक्ष प्रमोद कांडरकर, उपाध्यक्ष महेश मयेकर, निरीक्षक संदेश फाटक, महिला संघटक शहरी व ग्रामीण मुक्ता रजपूत, सौ. सीमा धुरी, कार्याध्यक्ष सुभाष प्रभू खानोलकर, सदस्य सीलिया डिया, तसेच कृ.सी. देसाई शिक्षण मंडळ मालवणचे सहसचिव संदेश कोयंडे, कोषाध्यक्ष नंदन देसाई, लक्ष्मीबाई टोपीवाला कन्या शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण शिंदे, सहशिक्षक प्रवीण साबळे, कनिष्ठ लिपिक आनंद नाईक, शिपाई महादेव गावकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!