पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मंजूर
फोंडाघाट (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली पुनर्वसन गावठाणातील प्रलंबित विकास कामे गेली अनेक वर्षे वेळोवेळी शासन दरबारी सांगून सुद्धा पूर्ण होत नसल्याकारणाने नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाने पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन ही विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी मागणी केली. त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभाग कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांसकडून प्रलंबित कामे मंजूर करून घेतली यामध्ये गटार दुरुस्ती, मुख्य नाला दुरुस्ती, रस्ते डांबरीकरण, समाजमंदिर दुरुस्ती, प्राथमिक शाळा दुरुस्ती, पाणीपुरवठा दुरुस्ती, स्ट्रीट लाईट बसविणे, ग्रामपंचायत कार्यालय बांधणे अशी कामे मंजूर करण्यात आली यापैकी आज नवीन कुर्ली गावातील रस्त्यालगतचे मुख्य गटार आणि नाला दुरुस्ती कामाचे शुभारंभ जि.प. सदस्य मनोज रावराणे यांच्या शुभहस्ते पार पडला.
या कार्यक्रम प्रसंगी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, अमित दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप कामतेकर, बूथ अध्यक्ष अतुल डऊर, कृष्णा परब, सखाराम हुंबे, राजेंद्र तेली, अरुण पाटील, आशिष पेडणेकर, अरुण पवार, शिवाजी चव्हाण, पांडुरंग चव्हाण, अनंत दळवी, केशव दळवी, पांडुरंग कोलते, महादेव येंडे, प्रदीप आग्रे, अंकुश दळवी, विजय कोलते, मंगेश मडवी, अजय कोलते, सचिन साळसकर, सुनील गोसावी, रोहित चव्हाण, प्रसाद कोलते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.












