कृषी महाविद्यालय सांगुळवाडीच्या विद्यार्थ्यांकडून पियाळी येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी चित्रकला स्पर्धा उत्साहात

वैभववाडी (प्रतिनिधी) : पियाळी येथील प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे रावे वाले कृषी महाविद्यालय, सांगुळवाडी यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, पर्यावरणपूरक व देशभक्तीपर विषयांवर आकर्षक चित्रे साकारत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.

या कार्यक्रमाला उपसरपंच विजय मुरकर तसेच ग्रामपंचायत सदस्य,यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. शाळेचे मुख्याध्यापक कदम सर तसेच सर्व शिक्षकांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळाली असून कला, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यात अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. आयोजनाबद्दल रावे वाले कृषी महाविद्यालयाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!