कणकवली (प्रतिनिधी) : लोरे नं. एक गावातील शिवगंगा वाडीतील रा. प. कणकवली बस स्थानकातून निवृत्त झालेले वाहतूक नियंत्रक अंबरनाथ पांडुरंग तोरसकर (वय ६६) यांचे नुकतेच डोंबिवली येथील निवासस्थानी निधन झाले. परोपकारी स्वभावामुळे ते रा. प. कर्मचारीवर्ग, तसेच जनसामान्यांत परिचित होते. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, नातवंडे, भाऊ, भावजय असा परिवार आहे. कणकवली बाजारपेठेतील सर्पमित्र, फुलराणी कलेक्शनचे अभयकुमार गणपत चव्हाण यांचे सासरे होते.
निवृत्त वाहतूक नियंत्रक अंबरनाथ तोरसकर यांचे निधन












