फोंडाघाट (प्रतिनिधी) : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र नाणीज यांच्या कणकवली तालुका सेवा समितीच्या वतीने फोंडाघाट आणि ओसरगाव या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. 300 झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमासाठी फोंडा घाट येथील वनपाल फोंडा सारीक फकीर, वनरक्षक पटेकर, वनरक्षक माने, वनरक्षक सोनगेकर, वनरक्षक स्वाती, वनरक्षक नितेंद्र, वनरक्षक शुभम, वनरक्षक भोसले, व RRT टीम उपस्थित होते. तसेच कणकवली तालुका सेवा समितीच्या वतीने तालुका अध्यक्ष नितीशकुमार कोंडविलकर, जिल्हा देणगी प्रमुख – शशांक एकावडे, विघ्नेश चव्हाण, अशोक जगताप, सुधाकर कुलकर्णी, दशरथ पाडावे, सत्यवान मेजारी, सहदेव कोंडविलकर, तसेच महिला अध्यक्ष एकता सावंत, साधना माने, सदिच्छा एकावडे, निधी कोंडविलकर, समिता चव्हाण, विजयालक्ष्मी पाडावे भक्त शिष्य उपस्थित होते.
कणकवली तालुका सेवा समितीच्या वतीने वृक्षारोपण !











