- डॉ. रुपेश पाटकर
……
धन्य माता मेरी तुला जन्म देई,
धन्य जेरूस्लेम अवतार पाही,
कसे जाणू तुला, तुझी लीला न्यारी
अनंताच्या पुत्रा गरीबी तुज प्यारी।१
जय देव जय देव जय येशू ख्रिस्ता।
तुजविण कोण शिकवी प्रेम हे नाथा।।धृ
प्रेम संदेश तुझ्या जीवनाचा,
सर्वाभूती प्रभू अर्थ बायबलचा,
सुष्ट दुष्ट तुला समान असति,
पापी पुण्या प्रति समान प्रिती।२
जय देव जय देव जय येशू ख्रिस्ता
तुजविण कोण शिकवी प्रेम हे नाथा।।धृ
मारीता एका गाली दुजा पुढे करा,
जग जिंकण्याचा उपाय हा न्यारा,
तुझ्या स्पर्शे म्हणे रोगी बरे होती,
शिकव मला एक सोने अन माती।३
जय देव जय देव जय येशू ख्रिस्ता
तुजविण कोण शिकवी प्रेम हे नाथा।।धृ
क्रूसावरूनि तू क्षमा करू पाही,
दयेला रे तुझ्या अंत कधी नाही,
धन्य बलिदान सांगे सर्व काही,
निष्काम प्रेमाला पर्याय नाही।४
जय देव जय देव जय येशू ख्रिस्ता
तुजविण कोण शिकवी प्रेम हे नाथा।।धृ
……
– डॉ. रुपेश पाटकर
(भगवान येशू ख्रिस्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!)











