डॉक्टरला जीवे मारण्याचा प्रयत्न करून कामात व्यत्यय आणल्या प्रकरणी आरोपीस जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : 16 मार्च 2026 रोजी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात मध्यरात्री उपचारासाठी गेलेल्या प्रकाश शामराव शिंदे याने डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिल्याच्या रागातून लोखंडी चाकूने डॉक्टरवर हल्ला करून शिवीगाळ करून ठार मारण्याचा प्रयत्न केला व डॉक्टरांना त्यांचे कर्तव्य बजावण्यात अडथळा निर्माण केला म्हणुन प्रकाश शिंदे याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023, कलम 132, 109(1), 352, 351(3) तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा – व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा – संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधि. 2010 चे कलम 4 तसेच भारतीय शस्त्र अधि.1959 चे कलम 4, 25 नुसार गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली होती. त्याकामी आरोपीचे वतीने जिल्हा सत्र न्यायालय ओरोस येथे जामीन मिळणे कामी अर्ज दाखल केला होता. त्याकामी सुनावणी होऊन जिल्हा सत्र न्यायाधीश ओरोस, सुधीर देशपांडे यांनी आरोपीस सशर्थ जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने कणकवली येथील अ‍ॅड. निकिता म्हापणकर यांनी यशस्वी युक्तीवाद केला. त्यांना अ‍ॅड. नितीन म्हापणकर व अ‍ॅड. शिवानी परब यांनी सहाय्य केले.

error: Content is protected !!