स्वयंभू श्री रवळनाथ मंदिरात दर्शन घेऊन संदेश पारकर यांनी मागितले शहराच्या प्रगतीचे आशीर्वाद

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहराचे आरोग्यदैवत श्री स्वयंभू मंदिर व श्री स्वयंभू रवळनाथ मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवाचे आशीर्वाद घेत शहराच्या प्रगतीसह आगामी सामाजिक व लोकहिताच्या कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. मंदिर परिसरात पारंपरिक वातावरणात दर्शन व पूजा संपन्न झाली. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अवधूत मालवणकर, रामदास मांजरेकर, फ्रँकी लोगो, काशिनाथ मेस्त्री, अक्षय मेस्त्री, कल्पेश मेस्त्री यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!