जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : संतोष पाटणक महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन – २०२६ मध्ये कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेतील कु.प्रथमेश राजू कट्टी व प्रणव सदू मीनके या दोन विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले असून या दोन्ही विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्राप्ती कट्टी माजी अध्यक्ष संतोष पाटणकर व्यवस्थापन समिती सदस्य मंगेश ब्रम्हदंडे यांनी अभिनंदन केले असून नुकताच या दोन्ही विद्यार्थ्यांचा शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका आरती जोजन व शिक्षक वृदानी शाळेत सत्कार केला.खारेपाटण केंद्र शाळेचे विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्ती करीता पात्र ठरत आहे.याकरिता शाळेच्या शिक्षिका राऊत मॅडम,काझी मॅडम,आरती जोजन,राठोड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!