कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या कणकवली येथील मठात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराजांचे आशीर्वाद घेत आपल्या पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी अवधूत मालवणकर, रामदास मांजरेकर, फ्रँकी लोगो, यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी संदेश पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.












