वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या भाजपच्या माजी बूथ अध्यक्षांना भाजपा युवा नेते विशाल परब यांच्याकडून आर्थिक मदत
बांदा (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथे अलीकडे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे भारतीय जनता पक्षाचे माजी बूथ अध्यक्ष एकनाथ साळगांवकर यांच्या नव्याने बांधलेल्या राहत्या घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले होते. या घटनेची माहिती मिळताच भाजपा युवा नेते विशाल परब यांनी तत्काळ भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि साळगांवकर कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात दिला. यावेळी परब यांनी कुटुंबीयांची विचारपूस करत, अशा कठीण प्रसंगी भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली. या प्रसंगी आरवलीचे सरपंच समीर कांबळी, उपसरपंच किरण पालयेकर, सागरतीर्थचे सरपंच एकनाथ कुडव, आरवलीचे माजी सरपंच तातोबा कुडव, शिरोड्याचे माजी सरपंच मनोज उगवेकर तसेच भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मीकांत कर्पे, शेखर गोडकर, महादेव नाईक, मिलिंद साळगांवकर आणि तुषार रगजी उपस्थित होते. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना वेळोवेळी मदत करण्याची भूमिका भाजपा युवा नेते विशाल परब सातत्याने निभावत असून, त्यांच्या या मदतीमुळे साळगांवकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.











