गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुट्या पैशांचा पुरवठा करण्याची व्यापारी संघटनेची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : आगामी गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी शहरातील व्यापारी आणि ग्राहक यांच्यातील आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडावेत तसेच सुट्या पैशांच्या कमतरतेमुळे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, या उद्देशाने वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने आज शहरातील विविध बँकांना सुट्या चलनी नोटा व नाण्यांचा पुरेसा पुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले.
सणासुदीच्या काळात बाजारपेठेत खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने सुट्या पैशांची टंचाई निर्माण होते. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन बँकांनी आवश्यक प्रमाणात सुटे पैसे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी व्यापारी संघटनेने निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत, वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तेजस आंबेकर, उपाध्यक्ष अरविंद गाड, तसेच कार्यकारिणी सदस्य रवींद्र पाटील, वसंत पटेल, सुरेंद्र नारकर, मनोज सावंत आणि संतोष कुडाळकर उपस्थित होते.

error: Content is protected !!