रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा पदभार समारंभ उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा वर्ष २०२६-२७ चा पदभार समारंभ अलंकार हॉल, कणकवली येथे मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात अबीर मराठे यांच्या गणेशस्तवनाने व “कौसल्येचा राम” या गीताने झाली. त्यानंतर राज नलावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी वर्ष २०२६-२७ साठीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. नगरसेविका व इंजिनिअरिंग महाविद्यालयातील प्राध्यापिक सुप्रिया नलावडे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. सचिवपदी डॉ. अमेय मराठे, खजिनदारपदी डॉ. प्राजक्ता नाचणे, उपाध्यक्षपदी तृप्ती कांबळे, सार्जंट-अॅट-आर्म्स स्नेहलता राणे, क्लब सर्व्हिस डायरेक्टर मेघा गांगण, व्होकेशनल सर्व्हिस डायरेक्टर मोहिनी राठोड, कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर रवी परब, इंटरनॅशनल सर्व्हिस डायरेक्टर नितीन बांदेकर, यूथ सर्व्हिस डायरेक्टर डॉ. धनंजय रासम, फॅमिली फेलोशिप डायरेक्टर महेंद्र मुरकर, क्लब लर्निंग फॅसिलिटेटर प्रमोद लिमये आणि संपादक अनिल कर्पे यांच्यासह संचालक मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला.तसेच रमेश मालविया, जीवन रेगे, दीपक अंधारी, दीपक बेलवलकर, समीर नलावडे, वर्षा बांदेकर, सोनू मालविया, संतोष कांबळे, स्मिता पावसकर, डॉ. विद्यालय तायशेटे, आनंद पोरे, लीना काळसेकर, जगदीश राणे, प्रीती पावसकर, सुहास पावसकर, हेमा तायशेटे, लवू पिळणकर, राजश्री रावराणे, संध्या पोरे, सोम गांगण, वीरेंद्र नाचणे, दिशा अंधारी, भेराराम राठोड, उमा परब, माधवी मुरकर, अंकित कर्पे, राजेश कदम, डॉ. अश्विनी नवरे आणि डॉ . स्वप्निल राणे यांनीही विविध पदांचा पदभार स्वीकारला. या समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून पीडीजी स्वाती हेरकर (वाई) उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी रोटरीच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी प्रकल्प प्रभावीपणे कसे राबविता येतील, याविषयी मार्गदर्शन केले.

मावळते अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे यांनी गतवर्षीच्या कार्याचा आढावा घेताना आरडीसी मीट, दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ॲपचे मोफत वाटप, करिअर मार्गदर्शन, ज्येष्ठ नागरिक दिन, स्वच्छता अभियान यांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. नूतन अध्यक्षा सुप्रिया नलावडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात “सर्वांसाठी सेवा” हे ध्येयवाक्य केंद्रस्थानी ठेवून कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. क्लबमधील प्रत्येक सदस्य हा आपल्या कुटुंबाचा महत्त्वाचा घटक असून प्रत्येकाच्या कौशल्याचा व अनुभवाचा उपयोग करून अधिक प्रभावी सेवा प्रकल्प राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, महिला व बालकल्याण, युवक विकास आणि सामाजिक जागरूकता या क्षेत्रांत विविध उपक्रम राबविण्यात येणार असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवेचा स्पर्श पोहोचविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. रोटरीचा प्रत्येक उपक्रम हा केवळ सेवा नसून समाजात विश्वास, संवेदनशीलता आणि सकारात्मक बदल घडविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचेही त्यांनी नमूद केले. “स्वतःपेक्षा सेवेचा विचार” हेच रोटरीचे ब्रीद असून सर्वांच्या सहकार्याने हे वर्ष यशस्वी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल संदीप राणे यांना फोर-वे टेस्ट सन्मान प्रदान करण्यात आला. हॉटेल व्यवसायात उल्लेखनीय कार्याबद्दल दत्ता शंकरदास व महेश शंकरदास यांना बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड देण्यात आला.

कणकवली शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या प्रकाश राठोड, विनोद कांबळे आणि समीर मोरे यांना व्होकेशनल अवॉर्ड प्रदान करण्यात आला. कै. रविंद्रनाथ मुसळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, नुकतेच केंद्रप्रमुख पदावरून सेवानिवृत्त झालेले विजय भोगले गुरुजी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मूकबधिर असूनही उत्कृष्ट चित्रकलेच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे स्वप्निल पांडुरंग पाटणकर यांनाही व्होकेशनल अवॉर्ड प्रदान करण्यात आला. रोटरी परिवारातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या अबीर मराठे, शौर्य नाचणे, आर्या तायशेटे, नित्यानंद मुरकर, अभिषेक राणे, स्वराली कदम आणि निर्झरा बांदेकर यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास असिस्टंट गव्हर्नर संजय रावराणे आणि अभिषेक माने, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली, राजेश घाटवळ आणि डॉ. विद्याधर तायशेटे, एरिया हेड नीता गोवेकर यांच्यासह देवगड, खारेपाटण, वैभववाडी, मालवण, कुडाळ, ओरस, सावंतवाडी, वेंगुर्ला, शिरोड आणि बांदा येथील रोटरी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कणकवली शहरातील अनेक मान्यवर नागरिकांनीही उपस्थित राहून नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व रोटेरियन यांनी परिश्रम घेतले. राजेश कदम, स्नेहलता राणे आणि मेघा गांगण यांनी एमओसी म्हणून जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाच्या शेवटी सचिव डॉ. अमेय मराठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!