चोरटा कळसुली गावातील
कणकवली (प्रतिनिधी) : येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला अखेर काही तासांमध्ये कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. अथर्व राणे (रा. कळसुली गवसेवाडी, व बिडवाडी वय 20) असे या संशयीत चोरट्याचे नाव असल्याची माहिती कणकवली पोलिसांनी दिली. दरम्यान कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सीसीटीव्ही फुटेचा आधार घेऊन चोरट्याला त्याच्या घराकडून शिताफीने ताब्यात घेतले. दरम्यान या चोरट्याने चोरीचा प्लान कसा केला किंवा त्या अनुषंगाने माहिती घेण्यासाठी सदर चोरट्यावर गुन्हा दाखल करत त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान संशयित चोरटा हा कळसुली गावसेवाडी येथे नातेवाईकांकडे राहतो. तसेच तो काही वेळा बिडवाडी येथे देखील नातेवाईकां जवळ असतो अशी माहिती पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दिली. कणकवली पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे जनतेतून कौतुक केले जात आहे.












