संदीप चौकेकर,अच्युत सावंत भोसले यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील विद्यामंदिर हायस्कुलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा 31 डिसेंबर रोजी सकाळी 9 :30 वाजता एच. पी. सी. एल. सभागृहात होणार आहे. प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर, भोसले नॉलेज सिटी सावंतवाडीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून पारितोषिक वितरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच वार्षिक स्नेहसंमेलन 1 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंडळ हॉल येथे संपन्न होणार आहे. कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, अध्यक्ष दत्तात्रय तवटे, सचिव विजयकुमार वळंजू, विश्वस्त अनिलपंत डेगवेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक अच्युत वणवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख जे. जे. शेळके यांनी केले आहे.










