अनुप वारंग यांची कणकवली भाजप ग्रामीण मंडल तालुका उपाध्यक्षपदी निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली भाजप ग्रामीण मंडलच्या तालुका उपाध्यक्षपदी अनुप वारंग यांची निवड करण्यात आली आहे. मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी ही निवड अधिकृतरीत्या जाहीर केली. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष तथा भाजप नेते गोट्या सावंत यांच्या हस्ते अनुप वारंग यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या निवडप्रसंगी संदेश उर्फ गोट्या सावंत, मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, प्रकाश सावंत, सोनू सावंत, सर्वेश दळवी, स्वप्निल चिंदरकर, पंढरी वायंगणकर, समीर प्रभूगावकर, संदीप सावंत, सचिन पारधीये, दिनेश गोठणकर, प्रज्वल वर्दम, आबा कोरगावकर, परेश कांबळी, गणेश तळगावकर, बाबू नारकर, नितीन पवार, सचिन खोचरे, सुहास राणे, अमोल रासम, अभय गावकर, स्वरुप कोरगावकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!