दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला शिवसेना उपनेते संजय आग्रे, माजी आमदार राजन तेली यांची सदिच्छा भेट

देवगड (प्रतिनिधी) : देवगड येथे सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या भव्य क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ दि. 01 जानेवारी ते 05 जानेवारी, 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या स्पर्धेचे आयोजन दिनेश गांवकर मित्रमंडळ, देवगड यांच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेला आज शिवसेना उपनेते संजय आग्रे व शिवसेना माजी आमदार राजन तेली, कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल तसेच युवराज आग्रे यांनी सदिच्छा भेट दिली.

कार्यक्रमावेळी आयोजक मंडळाच्या वतीने मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संजय आग्रे व राजन तेली यांनी स्पर्धेला मनःपूर्वक शुभेच्छा देत खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी देवगड तालुका प्रमुख अमोल लोके, देवगड नगराध्यक्षा साक्षी प्रभु तसेच देवगड युवा तालुका प्रमुख दिनेश गांवकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!