शिवसेना कणकवली उप तालुकाप्रमुख पदी संजय नकाशे

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुखपदी कासार्डे येथील संजय नकाशे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व कुडाळ-मालवणचे आम.डाॅ. निलेश राणे यांच्या आदेशाने जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी संजय नकाशे यांना नियुक्तीपत्र देत निवड जाहीर केली आहे. यापूर्वी संजय नकाशे यांच्याकडे वाहतूक सेनेची जबाबदारी देण्यात आली होती. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांची निवड उपतालुकाप्रमुख म्हणून करण्यात आली असून पक्षाला अपेक्षित काम करून कणकवली तालुक्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी निवडीअंती सांगितले.

error: Content is protected !!