३१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री रासाई देवी जत्रोत्सवानिमित्त श्री रासाई जनकल्याण बहुउद्देशीय संस्था आचिर्णे आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ जानेवारी २०२६ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीराला वैभववाडी पंचक्रोशीतील रक्तदांत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे शेखर रावराणे तसेच विजय रावराणे, सुशिल रावराणे, सत्यवान जाधव, स्वप्निल दर्डे तसेच मंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या रक्तदान शिबीरामध्ये ४० रक्तदात्यांनी उपस्थिती दर्शवली त्यापैकी ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबीराकरिता एस. एस. पी. एम. रक्तपेढी पडवे यांचे सहकार्य लाभले.












