जयेश धुमाळे ! भाजपा शहर “चाणक्य” बंडू हर्णे ना तब्बल १४३ मतांनी धोबीपछाड देणारा युवा झंझावात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत युवाशक्तीने जुने गणित उद्ध्वस्त करत नव्या, तडफदार आणि उच्चशिक्षित नेतृत्वाचा झंझावाती उदय घडवून आणला आहे. सक्रिय राजकारणात प्रथमच रणांगणात उतरलेल्या जयेश धुमाळे यांनी नगरपंचायतमधील ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे मातब्बर उमेदवार बंडू हर्णे यांना तब्बल १४३ मतांनी चितपट करत राजकीय भूकंप घडवून आणला आहे.

अल्पावधीतच जयेश धुमाळे यांनी बिजलिनगरवासीयांच्या मनात विश्वासाचे भक्कम स्थान निर्माण केले. कोणत्याही चर्चेत नसलेले, विरोधकांनी हलक्यात घेतलेले हे नाव शांत संयमाच्या आड लपलेल्या आक्रमक डावपेचांनी निवडणुकीचा संपूर्ण पट उलथवून टाकेल, याची कुणालाही कल्पना नव्हती.

या विजयापुरतेच न थांबता जयेश धुमाळे यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांना निर्णायक आघाडी मिळवून देत त्यांच्या विजयात किंगमेकरची भूमिका बजावली.

वॉर्ड क्रमांक १३ मध्ये नगरसेवक सुशांत नाईक यांची पारंपरिक साथ लाभल्याने ही लढत अधिकच रंगली. पाहिल्याच इनिंगमध्ये माजी उपनगराध्यक्षांचा पराभव करत जयेश धुमाळे यांनी आपले नेतृत्व ठामपणे सिद्ध केले असून कणकवलीच्या राजकारणात नव्या पॉवर सेंटरची नांदी झाली आहे.

विजयानंतर वार्ताहरांशी बोलताना जयेश धुमाळे यांनी वॉर्ड क्रमांक १३ मधील मतदारांचे आभार मानत, “पुढील पाच वर्षे विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या प्रत्येक कामासाठी कटिबद्ध राहीन,” असा ठाम शब्द दिला.

error: Content is protected !!