कणकवली (प्रतिनिधी) : सातारा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी कट्टामध्ये कणकवली येथील कवी राजस रेगे यांनी ‘कळी फुललीच’ ही कविता सादर केली. कवी कट्टामध्ये राज्यातील अनेक नामवंत कवींनी सहभाग घेतला होता. कविता सादर केल्यानंतर आयोजकांतर्फे राजस रेगे यांचा सत्कार शाल, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व अमेरिकेतील मराठी खासदार श्री. ठाणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी कट्टा संपन्न झाला.
अ. भा. मराठी साहित्य संमेलनात राजस रेगे यांचे काव्यवाचन












