मालवण (प्रतिनिधी) : चिपी विमानतळ वर नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायण राणे व नितेश राणे पालकमंत्री सिंधुदुर्ग यांचे पर्यटन व्यावसायिक महासंघ आभार मानत असून यामुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात वाढ होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर दरवर्षी दहा लाख पेक्षा जास्त पर्यटक प्रामुख्याने सागरी पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भेट देतं असतात या मध्ये देशविदेशातील पर्यटक वाढण्यासाठी आवश्यक सुविधा राज्य व केंद्र सरकार कडून उपलब्ध होत असून विमान प्रवासासाठी उपयुक्त असलेले चिपी विमानतळाची भूमिका यात महत्वाची आहे हे ओळखून खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेले विमानतळावर देशीविदेशी पर्यटक बारमाही विमानतळावर उतरण्यासाठी नाईट लँडिंग सुविधा आवश्यक होती यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय वाहतूक मंत्रालय यांच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध झाली असल्याने जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी माईलस्टोन ठरणार आहे तसेच विद्युती करणासाठी अडीच कोटी रुपये पालकमंत्री नितेश राणे यांनी उपलब्ध केल्याने चिपी विमानतळावर विमान वाहतूक दिवसरात्र चालू राहणार असून देशीविदेशी पर्यटकांमध्ये येणाऱ्या काळात वाढ होणार आहे या सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ला वल्ड हेरिटेज मध्ये नोंद झाल्यानंतर जिल्ह्यातील हिस्ट्री ऐतिहासिक पर्यटन वाढ होत असून बीच टुरिझम सोबत जंगल, साहसी, मेडिकल, धार्मिक पर्यटन साठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असून नाईट लँडिंग आणि यामुळे या विमातळावंर वाहतुकीसाठी उपलब्ध होणाऱ्या विमानामुळे विमान संख्या वाढल्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी आरामदायी सुविधा उपलब्ध होणार असल्याने जिल्ह्यातील होमस्टे, रिसॉट, लॉजींग बोर्डीग व्यासायिकां तसेच पर्यटन क्षेत्रात काम शाश्वत व्यवसाय वाढीसाठी मदत होणार आहे अशी माहिती विष्णू उर्फ बाबा मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी चिपी विमानतळ नाईट लँडिंग सुविधा माईलस्टोन ठरेल- बाबा मोंडकर












